#PAKvNZ : सुरक्षेच्या नावाखाली खाल्ली लाखोंची बिर्याणी

पाकिस्तान क्रिकेट मंडळाला न्यूझीलंडच्या माघारीने बसला फटका

इस्लामाबाद – न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून माघार घेत मायदेशी प्रयाण केले. ही मालिका रद्द झाल्यामुळे मुळातच तोटा झालेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाला सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पाकिस्तानच्या पोलिसांच्या जेवणावर झालेल्या लाखो रुपयांच्या खर्चामुळेही मोठा फटका बसला आहे.

न्यूझीलंडचा संघ तब्बल 18 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय आणि टी -20 मालिका खेळवली जाणार होती. मात्र, न्यूझीलंड संघाने सुरक्षेचे कारण देत पहिला सामना सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी अचानक या मालिकेतून माघार घेतली व मायदेशी प्रयाण केले.

सुरक्षेवरून पाकिस्तानची जगभरात नाचक्‍की होत असतानाच या सामन्यांसाठी तैनात करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या पोलिसांनी केवळ आठच दिवसांत तब्बल 25 ते 27 लाख रुपयांची बिर्याणी खाल्ल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानमधील एका वाहिनीने याबाबत गौप्यस्फोट केला आहे. न्यूझीलंड संघाचा इस्लामाबादमधील सेरेना हॉटेलमध्ये मुक्‍काम होता. याठिकाणी इस्लामाबाद पोलीस खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.

एकूण 500 पोलिसांना हॉटेल तसेच परिसरात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. या पोलिसांच्या जेवणाचे बिल तब्बल 27 लाख रुपये आले आहे. सुरक्षेत तैनात असलेले पोलीस दिवसातून दोन वेळा बिर्याणी खात होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.