मुंबई – भारताचा अष्टपैलू फलंदाज, माजी कर्णधार, यष्टीरक्षक अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीने काल (शनिवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच धोनीपाठोपाठ भारतीय संघातील त्याचा सहकारी सुरैश रैना याने देखील निवृत्ती जाहीर केली आहे.
View this post on Instagram
Thanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired
दरम्यान, आपल्या कॅप्टन कुलच्या निवृत्तीची घोषणा ऐकल्यानंतर धोनीला सोशल मीडिया माध्यमातून त्याच्या चाहत्यांनी भावूक होत धन्यवाद दिले आहेत. बॉलिवूड कलाकारांनी देखील कॅप्टन कूल धोनीला भावनिक निरोप दिला आहे.
#AnushkaSharma pays a tribute to #MSDhoni after the cricketer announced his retirement today. pic.twitter.com/VISAFTNBVO
— Filmfare (@filmfare) August 15, 2020
यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, अभिनेता रणदीप हुड्डा, वरून धवन, रितेश देशमुख, विक्की कौशल यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर पोस्ट आपल्या भावना व्यक्त केल्या.
Nooooo !!!
You’ve always known the best ..
Thanks for the entertainment 🙏🏽🤗 #Dhoni #MSDhoni pic.twitter.com/0Jwqb4hgaT— Randeep Hooda (@RandeepHooda) August 15, 2020
महेंद्र सिंग धोनी हा गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक 2019 च्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध धोनी शेवटची मॅच खेळला होता. यानंतर धोनी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये धोनी दिसला नव्हता. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. पण, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
No retirement from our hearts ♥️ #MSDhoni @msdhoni pic.twitter.com/SMRA15L00L
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 15, 2020