पुणे – येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशीरापर्यंत हॉटेलमध्ये चालणार्या साउंडसिस्टिम गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. यावेळी गौरीशंकर कल्यानण बंगाले, सेंट्रल अॅव्हेन्यु, निलांजली सोसायटी येथील एलिफंट अॅण्ड को. रेस्टॉरन्ट अॅण्ड बारवर कारवाई करण्यात आली. यावेळी गुन्हे शाखेने 4 लाखांचे साऊंड सिस्टिम जप्त केली. संबंधीत हॉटेलवर पर्यावरण कायद्याचा भंग केल्या्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकताच मतदारसंघातील अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशिररित्या चालणार्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याच धर्तीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार येरवडा पोलिस ठाण्याच्या परिसरात रात्री उशीरापर्यंत हॉटेलमध्ये चालणार्या साउंड सिस्टिम पोलिसांनी जप्त केली.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, अंमलदार अजय राणे, हनमंत कांबळे, अमेय रसाळ, अमित जमदाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली