विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता, विद्युत गट-ब या पदासाठी दि. 24 नोव्हेंबर 2018 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील धनश्‍याम रामगडे हे राज्यातून व मागासवर्गीयातून प्रथम आले आहेत. उमेदवारांना मिळालेल्या गुणांचा तपशीलही प्रसिद्ध करण्यात आला आहे. याची पूर्व परीक्षा 8 जुलै 2018 रोजी, तर मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2018 मध्ये घेण्यात आली होती. दि. 15 एप्रिल रोजी मुखाखती झाल्या. ज्या उमेदवारांना गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्‍यक आहे, असेही आयोगाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.