पुणे – विशेष समिती अध्यक्षांची आज निवड

पुणे – महापालिकेच्या शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, विधी आणि क्रीडा समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी होणार आहे. दरम्यान, या चारही समित्यांमध्ये पक्षीय बलानुसार, भाजपचे सर्वाधिक सदस्य असल्याने या समितींची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदे भाजपकडेच राहणार असून ही निवडणूक केवळ औपचारिकता असणार आहे.

शहर सुधारणा समितीसाठी अध्यक्षपदासाठी भाजपने अमोल बालवडकर व उपाध्यक्षपदासाठी धनराज घोगरे यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने अनुक्रमे युवराज बेलदरे आणि रकि शेख यांना उमेदवारी दिली आहे. विधी समिती अध्यक्षपदासाठी भाजपने योगेश समेळ तर उपाध्यक्षपदासाठी वीरसेन जगताप यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनुक्रमे योगेश ससाणे व बाळाभाऊ धनकवडे यांना उमेदवारी दिली आहे. महिला बालकल्याण समिती अध्यक्षपदासाठी भाजपने ज्योत्स्ना एकबोटे तर उपाध्यक्षपदासाठी श्रद्धा प्रभुणे यांना तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने अनुक्रमे संजीला पठारे आणि लता राजगुरु यांना उमेदवारी दिली आहे. क्रीडा समिती अध्यक्षपदासाठी भाजपने विजय शेवाळे तर उपाध्यक्षपदासाठी महेश वाबळे यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनुक्रमे लक्ष्मी आंदेकर आणि भैय्यासाहेब जाधव यांना उमेदवारी दिले आहे. सर्व समित्यांमध्ये भाजप-शिवसेनेचे बहुमत असल्याने भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)