एमआयडीसीतील इलेक्‍ट्रिकच्या गोदामाला भीषण आग

नगर: नगर एमआयडीसी तलाठी कार्यालयाच्या मागे असलेल्या मयूर इलेक्‍ट्रीक गोदामाला पहाटे भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात असून, नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजेले नाही.

रविवार (दि.2) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ नगर अग्निशमन दलाचे दोन बंब तर एमआयडीसीचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर आग आटोक्‍यात आली. सावेडी येथील अग्निशमन विभागाचे वाहनचालक सिंधू भांवरे,फायरमन बाबासाहेब कदम,बाबासाहेब वाघ तर मुख्य अग्निशमन विभागाचे वाहन चलक साकीर रंगारी, फायरमन भरत पडगे, नानासाहेब सोलट आदींनी आग आटोक्‍यात आनली. यामध्ये एलसीडी, डिश टिव्हीसह मोठ्या प्रमाणात इलेट्रॉनिक वस्तू भस्मसात झाल्या असून लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.