पुणे – मित्राकडील मर्सिडीज कार आपल्याला आवडली आपण ती विकत घेणार असल्याचा बहाणा करुन वापरण्यासाठी घेतलेली मित्राची कार मित्रानेच परस्पर विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी इमरान अमर शेख व प्रशांत ज्ञानाेबा गायकवाड (रा.मुंढवा,पुणे) या आराेपींवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा वारजे पाेलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अमिरुल्ला हबिबुल्लाह चाैधरी (वय-४३,रा.आंबेगाव,पुणे) यांनी पाेलीसांकडे फिर्याद दिली आहे. अमिरुल्ला चाैधरी यांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांनी त्यांचेकडील ३९ लाख रुपये किंमतीची मर्सिडिज बेन्ज (एमएच १२ आरटी ७३१६) ही कार विक्री करण्याचे ठरवले हाेते. याच दरम्यान त्यांचा आराेपी मित्र इमरान शेख याने सदर गाडी मी काही दिवस वापरण्याकरिता घेऊन जाताे आणि मला चांगली वाटली तर मी विकत घेताे असे सांगितले.
त्यानंतर शेख याने सदर गाडी आपल्याला चालविल्यानंतर आवडल्याचे सांगुन गाडी खरेदी करण्यासाठी चार लाख ४३ हजार रुपये चाैधरी याचे बँक खात्यावर पाठवले आणि गाडीचे हप्ते भरताे असे सांगितले. परंतु गाडी मिळाल्यानंतर चाैधरी याने परस्पर गाडी खरेदीची नाेटरी करुन स्वत:चे फायद्याकरिता तिची विक्री करुन चाैधरी यांची ३९ लाखांची फसवणुक केली आहे.
चाैधरी यांना सदर प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शेखकडे पैशांची मागणी केली असता त्याने पैसे देण्यास नकार दिला तसेच त्याने हप्ताचे भरलेले बँकेचे चेक बाऊन्स झाल्याने बँकेकडून चाैधरी यांना दंड लावण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास वारजे पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी करत आहे.