पिंपरी -पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनची शनिवारी (दि. 30) निवडणूक होणार आहे. असोसिएशनच्या अध्यक्ष पदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. असोसिएशनला नवा अध्यक्ष कोण मिळतो, याचे चित्र सायंकाळी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
ऍडव्होकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदासाठी ऍड. सचिन थोपटे, ऍड. रामहरी कसबे, ऍड. मुकुंद ओव्हाळ, ऍड. पांडुरंग शिनगारे आदी वकील उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यातील कोण बाजी मारेल, हे पाहणे लक्षवेधक ठरणार आहे.
पिंपरी-मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील ऍडव्होकेट बार असोसिएशनच्या बार रुममध्ये गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. असोसिएशनसाठी निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांची संख्या पाहता मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
यापूर्वी ही वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 अशी होती. मात्र, नव्या बदलानुसार आता मतदान सकाळी 9 ते सायंकाळी 4:30 या वेळेत होणार आहे, असे निवडणुक कार्यकारी समितीने कळविले आहे. सायंकाळी सहानंतर मतमोजणी होऊन निवडणूक निकाल जाहीर केला जाणार आहे.
निवडणुकीत हिशेब तपासणीस पदासाठी ऍड. गोरख मकासरे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सचिव (महिला), सह-सचिव, खजिनदार यांच्या प्रत्येकी एक जागेसाठी 3 ते 4 उमेदवार इच्छुक आहेत.
निवडणूक लढवित असलेले अन्य उमेदवार पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष – ऍड. किशोर गुरव, ऍड. प्रतीक्षा खिलारी, ऍड. जयश्री कुटे, ऍड. गौरव वाळुंज. सचिव – ऍड. निखिल बोडके, ऍड. संतोष मोरे, ऍड. गणेश शिंदे. सचिव (महिला) – ऍड. सोनल चांडक, ऍड. प्रमिला गाडे, ऍड. प्रियंका सुरवसे, ऍड. पल्लवी विघ्ने. सह-सचिव – ऍड. केशव घोगरे, ऍड. नीलेश जाधव, ऍड. सुनील रानवडे, ऍड. प्रताप साबळे. खजिनदार – ऍड. सोनाली घाडगे, ऍड. अनिल पवार, ऍड. मोनिका सचवाणी. सदस्य पदाच्या 6 जागांसाठी 14 जण इच्छुक आहेत.