लोकसभा सभापतीपदाच्या तालिकेवर चौघांची निवड

नवी दिल्ली: लोकसभा सभापतीपदाच्या तालिकेवर भाजपच्या चौघांची निवड करण्यात आली आहे. सभापती बिर्ला यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालवण्याचे काम या चौघांवर राहील. रामादेवी, किर्ती सोळंकी, राजेंद्र आगरवाल, आणि मीनाक्षि लेखी अशी या तालिकेवर निवड झालेल्या चौघांची नावे आहेत. या तालिकेवर अन्य विरोधी पक्षांनी त्यांच्या सदस्यांची नावे दिली तर यातील सदस्यांची संख्या वाढवली जाईल अशी माहिती सभापती बिर्ला यांनी दिली.

साधारणपणे या तालिकेवर दहा जणांची निवड होते. त्यामुळे अजून तेथे सहा सदस्य निवडण्यास संधी आहे. विरोधी पक्षांनी त्यासाठी आपल्या पक्षांतर्फे उमेदवारांची नावे द्यावीत अशी सुचना सभापतींनी केली. अन्य पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांच्या नावांच्या सुचना येण्याच्या आधीच भाजपने त्यांचे चार प्रतिनिधी या तालिकेवर निश्‍चीत केले. त्यामुळे त्यांची नावे आज जाहीर करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.