वाघोली – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, सुनील टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अब्दुल हाफिज शेख यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर युवक कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दीपक मानकर यांनी मोहसीन हसन शेख यांची अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी व अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष म्हणून समीर अन्सार शेख यांची निवड जाहिर केली आहे. अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय असणारे अब्दुल हाफिझ शेख यांचे पुणे शहरात युवकांचे मोठे संघटन आहे. अजित पवार यांचे निकटवर्ती मानले जाणारे व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पकड असणारे अब्दुल हाफिझ शेख यांनी यापूर्वी वेगवेगळ्या पदांवर महत्त्वाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पार पाडली आहे. निवडीबद्दल शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.