शिरूर – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 21) मतदान होत असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून ज्या-त्या मतदानकेंद्रांवर निवडणूक साहित्य व कर्मचारी तैनात झाले, असल्याची माहिती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे
यांनी दिली.
श्रीमंत पाटोळे यांनी सांगितले की, निवडणुकीच्या अनुषंगाने कुकडी हॉल शिरूर येथून मतदान पथके रविवारी (दि. 20) रवाना झाली. शिरूर-हवेलीत पुरुष 2 लाख 382, तर महिला 1 लाख 82 हजार 492 असे एकूण तीन लाख 83 हजार 886 एवढी मतदार आहेत. शिरूर-हवेली येथे एकूण सात मंडलाअंतर्गत मूळ 376, सहाय्यकारी 13 अशी एकूण 389 मतदान केंद्राचा समावेश आहे, तसेच एकूण 30 झोन आहेत. या निवडणुकीसाठी या मतदान केंद्रावर मतदान पथके ने-आण करण्यासाठी एकूण 87 वाहनांचा वापर केला गेला आहे. तर एकूण 2547 कर्मचारी काम करणार असल्याची माहिती श्रीमंत पाटोळे यांनी दिली. यामध्ये मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचा
समावेश आहे.