बीकेटीचा ला लिगाशी करार

मुंबई: बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी) या भारतातील आघाडीच्या ऑफ-हायवे टायर उत्पादकाने लालिगाचा अधिकृत जागतिक भागीदार म्हणून करार केला आहे. बीकेटीने एखाद्या खेळाप्रमाणे, कोणत्याही मर्यादांविना कामगिरी करायचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि लिगा दे फुटबॉल प्रोफेशनल (लालिगा) प्रमाणे बीकेटी जागतिक स्तरावर कार्यरत आहे. हा करार तीन वर्षांसाठी आहे.

बीकेटी आणि क्रीडा विश्व तसेच संपूर्ण फूटबॉल जगत यांच्यातील या कराराने अनेक स्पर्धा तसेच खेळाडूंना लाभ होणार आहे. बीकेटी जगभर विविध क्रीडा उपक्रमांसाठी पाठिंबा देत असताना, त्यामध्ये लालिगाचा अधिकृत जागतिक भागीदार बनण्याचा समावेश करण्यात आला आहे.

या उपक्रमांमध्ये, बीकेटी टायर लावलेले भव्य मॉंस्टर ट्रक थरारक स्टंट करतात त्या मॉंस्टर जॅम सर्किट या अमेरिकन मोटर स्पोर्टबरोबरचा 2014 करार; इटालियन सेकंड लीग चॅम्पिअनशिपची प्रशासकीय संघटना असणाऱ्या लेगा नाझीओनेल प्रोफेशनिस्ती बीबरोबर प्रायोजकत्व करार, जो गेल्या वर्षी करण्यात आला व जून 2021 पर्यंत लागू राहणार आहे व त्याचे नाव सेरी बीकेटी असे करण्यात आले आहे.

भारतात फूटबॉल अतिशय लोकप्रिय आहे आणि जागतिक स्तरावर अव्वल फूटबॉल संघ बनण्याची भारतीय संघात क्षमता आहे. देशात फूटबॉलसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे. याबरोबरच, बीकेटीने जून 2024 पर्यंत फ्रेंच कूप दे ला लिग बीकेटी ही फूटबॉल स्पर्धाही प्रायोजित केली आहे, तसेच केएफसी बिग बॅश लीगसह ऑस्ट्रेलियन क्रिकेट स्पर्धेशीही भागीदारी केली आहे आणि ही भागीदारी आणखी दोन वर्षांसाठी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)