नवी दिल्ली – मास्क न घालता सध्या अनेक राजकीय नेते व स्टार प्रचारक बंगाल मधील निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. त्यांना निवडणूक आयोगाने फटकारले आहे. करोनाच्या संबंधात गेल्यावर्षीै जी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत त्याचे सर्व राजकीय नेत्यांनी पालन करावे अशी सूचनाही आयोगाने केली आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचार सभांमध्ये व रोडशो मध्ये भाजप नेते अमित शहा यांच्यासह अनेक राजकीय नेते तोंडावर मास्क न घालताच वावरत असल्याचे दिसून आल्यानंतर काही प्रसार माध्यमांवर त्यावरून मोठा आरडाओरडा झाला होता. करोनाचे कोणतेही नियम न बाळगता किंवा मास्क न घालता प्रचार करणाऱ्या या नेत्यांनी जनतेचाच जीव धोक्यात घालण्याचे काम केले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
जे उमेदवार किंवा स्टार प्रचारक अशा प्रकारे निवडणूक प्रचार करतील त्यांच्या प्रचाराला बंदी घालण्याची कारवाई केली जाईल असा इशाराही निवडणूक आयोगाने दिला आहे.आसाम, केरळ, आणि तामिळनाडुतील मतदान प्रक्रिया आता संपली असली तरी अजून केरळातील मतदानाचे पाच टप्पे शिल्लक आहेत. त्यामुळे तेथे यापुढील काळात प्रचार करणाऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.