‘सुरळीत लसीकरण’ हाच करोना रोखण्याचा प्रभावी उपाय; आंतरराष्ट्रीय नाणे निधी व जागतिक बॅंकेचे प्रतिपादन

वॉशिंग्टन – जगभरात करोनाचे जे संकट निर्माण झाले आहे ते यापुढील काळातही बरीच वर्ष कायम राहणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जगातील सर्व देशांमध्ये करोना लसीचा सुरक्षित आणि सुरळीत पुरवठा होणे आणि व्यवस्थीत लसीकरण होणे हेच महत्वाचे आहे असे जागतिक बॅंक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींची नुकतीच एक संयुक्त बैठक घेण्यात आलीे.

त्यात जगभरातील करोनाची स्थिती आणि त्याचे अर्थकारणावर होणारे परिणाम याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर प्रसिद्धीला देण्यात आलेल्या एका संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
जगभरातील गरजूंना समान आणि पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होण्याची गरज असून त्यासाठी व्यापक स्तरावर समन्वयाची गरज आहे असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

करोनामुळे जागतिक अर्थकारणावरही विपरित परिणाम होत असून त्यामुळे जगातील दारिद्य्र, असमानता वाढत असून विकाची गतीही उलटी फिरत आहे. हा भाग लक्षात घेतला तर त्याच्यावरही संयुक्तपणे प्रयत्न हाती घेण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.