निवडणूक आयोगाने दूरदर्शनला फटकारले

नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षास “मै भी चौकीदार” मोहिमेवरून नोटीस बजावली होती. निवडणूक आयोगाने केलेली ही कारवाई भारतीय जनता पक्षासाठी मोठा झटका मानला जात आहे. यातच पुन्हा एकदा भाजपच्या “मै भी चौकीदार” मोहिमेवरून आयोगाने दूरदर्शनलाही नोटीस बजावली आहे.

दूरदर्शनवर नरेंद्र मोदींची भाषणं ३१ मार्चला दोन तास सातत्याने दाखवण्यात आले यामुळे दूरदर्शनला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. तत्पूर्वी दूरदर्शनवर प्रसारित कार्यक्रमावर माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचं एक प्रतिनिधी मंडळ निवडणूक आयोगाकडे गेले होते.

 

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.