पिंपरी- सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात तळेगाव ढमढेरे येथील 78 वर्षीय ज्येष्ठाचा करोनाने मृत्यू झाला. रुग्णालयामध्ये नव्याने चार रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. तर, करोनामुक्त झालेल्या तिघांना घरी सोडण्यात आले.
केलवडे (ता. भोर), भाजे (ता. मावळ), नवी सांगवी आणि शिरूर तालुका येथील चार रुग्णांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन पुरुष आणि दोन महिला रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. करोनामुक्त झालेल्या शिरूर आणि सांगवी येथील तिघांना आज घरी सोडण्यात आले. त्यामध्ये दोन पुरुष आणि एक महिला रुग्णाचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 20 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत करोनामुक्त झालेल्या 754 जणांना घरी सोडण्यात आले. 307 रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे. 680 रुग्णांना होम क्वॉरंटाइन केले आहे.