पुणे – पेटीयम अपडेट करायच्या बहाण्याचे क्विक सपोर्ट ऍप डाऊनलोड करायला भाग पाडत एका ज्येष्ठ दांम्पत्याची फसवणूक करण्यात आली. त्यांच्या बॅंक खात्यातून 1 लाख 8 हजार 836 रुपये वर्ग करुन घेण्यात आले. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शिवप्रसाद भगीरत मंत्री (68,रा.आनंद कॉलनी, एरंडवणे) यांना व त्यांच्या पत्नीला अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्यांना पेटीएम अपडेट करावयाचे असल्याचे सांगत क्वीक सपोर्ट ऍप व पत्नीला एसएमएस टू फोन हे ऍप डाऊनलोड करावयास सांगण्यात आले. यानंतर दोघांच्याही बॅंक खात्यातून ऑन लाईन पैसे काढून घेण्यात आले. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहेत.