मुंबई – बॉलिवूड अभिनेता जितेंद्र यांची लेक आणि निर्माती एकता कपूरने इतिहास रचला आहे. एकताने नवा विक्रम रचला आहे. टीव्ही ते ओटीटी आणि हिंदी चित्रपटांपर्यंत ते उत्कृष्ट दिग्दर्शक – निर्माते म्हणून ओळखली जाते. एकताने ‘नागिन’सारखे शो केले आणि अनेक अभिनेत्रींचे करिअर सेट केले. यासह आता एकता कपूरने जागतिक स्तरावर भारताचे डोके अभिमानाने उंच केले आहे. एकता कपूरला आंतरराष्ट्रीय एमी डायरेक्टर अवॉर्ड मिळाला आहे.
51 व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळ्यात जितेंद्र यांच्या मुलीला आंतरराष्ट्रीय एमी डायरेक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहे. 20 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय टेलिव्हिजन उद्योगातील योगदान आणि सह-संस्थापक म्हणून बालाजी टेलिफिल्म्स प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे.
इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेसचे सीईओ ब्रूस एल पेसनर यांनी एकता कपूरच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबाबत माहिती दिली. एकता कपूरने तिच्या प्रॉडक्शन हाऊस बालाजी टेलिफिल्म्सद्वारे भारतातील लाखो लोकांचे मनोरंजन केले आहे. टेलिव्हिजन सामग्रीच्या दुनियेत त्याने आपल्या प्रॉडक्शन हाऊसला या टप्प्यावर नेले आहे. तिच्या मालिका टीव्हीवर खूप लोकप्रिय आहेत आणि संपूर्ण भारत आणि दक्षिण आशियामध्ये OTT प्रसारित केल्या जातात. एकता कपूर एमी डायरेक्टर अवॉर्डची पात्र आहे.
1994 मध्ये झाले होते बालाजी टेलिफिल्म्स सुरू
एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊस बालाजी टेलिफिल्म्सबद्दल बोलायचे झाले तर, ते 1994 मध्ये सुरू झाले होते. आई-वडील जितेंद्र कपूर आणि शोभा कपूर यांच्यासोबत एकताने हे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. तिचे वडील आणि अभिनेते जितेंद्र निर्माता आहेत तर आई शोभा मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते.