मुंबई – मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का सध्या काश्मीरमध्ये आहे. कॅरोलिना काश्मीर ट्रिप एन्जॉय करत असून तिने नुकतेच शिकारीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यापूर्वी काश्मीरचे कौतुक करताना कॅरोलिना म्हणाली होती की, आम्ही येथे जे पाहिले ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. इथल्या सर्वांनी आमची खूप काळजी घेतली आणि आमचे इतक्या प्रेमळपणे स्वागत केले की, मला माझ्या कुटुंबासह काश्मीरला परत यायला नक्कीच आवडेल.’ असं म्हणत तिने काश्मीरचे कौतुक केले. यावेळी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कॅरोलिना बिलावस्काने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याबाबतही मोठा खुलासा केला आहे.
#WATCH | Miss World Karolina Bielawska on her aspirations to work in Bollywood films
“…It would be lovely to be in a movie of Shah Rukh Khan. I’ve had the privilege of meeting director Sajid Nadiadwala…and to also work with SLB (Sanjay Leela Bhansali) in the movies he has… pic.twitter.com/7juaE9JzRE
— ANI (@ANI) August 29, 2023
मुलाखतीत कॅरोलिना बिलाव्स्काने चित्रपटात काम करण्याबाबत मोकळेपणाने सांगितले. ती म्हणाली, “मी जर शाहरुख खानच्या चित्रपटात काम केले तर खूप छान होईल. मला चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला यांना भेटण्याचा बहुमान मिळाला आहे. आणि संजय लीला भन्साळीसोबत काम करण्याची संधीही मिळाली आहे. यावेळी तिने सांगितले की,’मी शाहरुख खानची मोठी चाहती असून मला एकदा त्याच्या चित्रपटात काम करायचे आहे.
या वर्षाच्या अखेरीस मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेचे आयोजन करत आहे. यापूर्वी ही स्पर्धा भारतात 1996 मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर मिस वर्ल्ड इंडिया सिनी शेट्टी आणि मिस वर्ल्ड कॅरेबियन देखील कॅरोलिनासोबत काश्मीर दौऱ्यावर हजर राहिल्या आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.