eknath shinde – ज्यांना स्व. बाळासाहेब ठाकरे (balasaheb thakre) यांनी विरोध केला त्या सर्वांसोबत आता युती केली जात आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी ठाकरे गट (uddhav thackeray) आणि समाजवादी पक्षाच्या युतीवर टीकास्त्र सोडले.
एकनाथ शिंदे, जेव्हा त्यांनी कॉंग्रेससोबत युती केली तेव्हाच त्यांचे हिंदुत्व कळाले. त्यांनी त्याचवेळी बाळासाहेबांच्या विचारांना देखील तिलाजंली दिली. महाराष्ट्रातील जनेतची देखील त्यांनी फसवणूक केली आहे.
त्यामुळे त्यांनी आमच्या हिंदुत्वाविषयी बोलू नये. ज्यांना-ज्यांना बाळासाहेबांनी विरोध केला त्या सगळ्यांसोबत ते युती करतील, असा टोलाही त्यांनी लगाविला.
ठाकरेंचा हल्लाबोल..!
शिवसेना ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाची संयुक्त बैठक रविवार (15 ऑक्टोबर) रोजी पार पडली. पोटनिवडणूक जिंकलो तेव्हा भाजपने हिंदुत्व म्हणून एकत्र आलो. पण सत्ता नसताना देखील जे एकत्र येतात ते चिरकाल टिकतात.
मी आज समाजवादी पक्षासोबत येत असल्याने तुमच्या पोटात दुखण्याचा कारण काय. या पक्षामध्ये मुस्लिम देखील आहेत. पण ते देशावर प्रेम करणारे आहेत.
तुम्ही गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करु शकता मग आम्ही समाजवादी पक्षासोबत आलो तर अडचण काय?, असा सवाल करत उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी भाजपवर निशाणा साधला.