मुंबई – अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील एका निष्ठावंत नेत्याने आपल्याशी संपर्क करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात सामिल होण्याची ऑफर दिली होती परंतु आपण ही ऑफर साफ धुडकावली आहे असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, मला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचा अजित पवार यांच्या वतीने फोन आला होता आणि त्यांनी मला त्यांच्या गटात सामिल होण्यास सांगितले होते. पण मी शरद पवारांशी (shard pawar) एकनिष्ठ असल्याचे त्यांना स्पष्टपणे सांगितले.
शरद पवारांची साथ आपण सोडू शकत नाहीं असेही मी त्यांना स्पष्ट सांगितले आहे असे खडसे यांनी पत्रकारांना सांगितले. खडसे हे एकेकाळी भाजपचे निष्ठावान सैनिक होते पण त्यांनी अलिकडेच भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांची विधान परिषदेवरही नियुक्ती करण्यात आली आहे.