सातारा -जिल्ह्यातील आणखी आठ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची संख्या 1563 वर पोहचली आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांमधील सिद्धेश्वर कुरोली ता. खटाव येथील 73 वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पिटलमध्ये तडावळे ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, तसेच महादेवनगर ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, पुसेगाव ता. खटाव येथील 69 वर्षीय पुरुष, करंजे पेठ ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष, सदरबझार ता. सातारा येथील 82 वर्षीय महिला, विसावा नाका ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, निंभोरे ता. फलटण येथील 76 वर्षीय पुरुष अशा एकूण आठ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
236 नागरिकांची करोनावर मात
जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेले 236 नागरिक करोनामुक्त झाल्याने त्यांना सोमवारी घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर 386 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 71, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 22, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 11, कोरेगावमधील 21, वाईतील 26, खंडाळा येथील 34, रायगावमधील 23, पानमळेवाडीतील 32, महाबळेश्वरमधील 35, पाटणमधील नऊ, दहिवडीतील 14, तळमावले येथील 33 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 55, अशा एकूण 386 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.