Dainik Prabhat
Sunday, July 3, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

विदेशरंग : बुडत्याचा पाय खोलात

- आरिफ शेख

by प्रभात वृत्तसेवा
May 28, 2022 | 5:45 am
A A
विदेशरंग : बुडत्याचा पाय खोलात

पाकिस्तानचे दुष्टचक्र संपायला तयार नाही. सत्तेसाठी एकत्र आलेल्या व परस्परविरोधी विचारांच्या पक्षांमुळे तेथे राजकीय अस्थिरता अजूनही आहेच.

पाकिस्तानसमोर दुहेरी समस्या निर्माण झाली आहे. सात दिवसांच्या चर्चेनंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) पाकिस्तानला सहा अब्ज डॉलरचे कर्ज देण्यास तयार नाही. त्यामुळे पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डीझेलच्या दरात प्रति लिटर तीस रुपयांनी (पाकिस्तानी चलनात) वाढ केली आहे. अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी सरकारकडे इंधनाचे दर वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असे या दरवाढीचं समर्थन केले आहे. इंधनावर अजूनही प्रतिलिटर 56 रुपये अनुदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शाहबाज शरीफ सरकारला सहा दिवसांत निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची मुदत दिली आहे. सरकारने तसे केले नाही, तर इस्लामाबाद आणि देशभरात मोर्चे काढण्याचा आणि धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंदोलनाच्या काळात हिंसाचार झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा पक्ष रस्त्यावर उतरल्याने ठिकठिकाणी हिंसाचार सुरू झाला आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल 179.85 रुपये प्रतीलिटर, डीझेल 174.15 रुपये, रॉकेल 155.95 तर हलके डीझेल 148.41 रुपये प्रतिलीटर आहे.

भारताचा एक रुपया पाकिस्तानच्या 2.61 रुपयांच्या बरोबरीचा आहे. डॉलरचा विनिमय दर विचारात घेतला, तर पाकिस्तानला एक डॉलरसाठी 202 पाकिस्तानी रुपये मोजावे लागतात. इम्रान खान यांचे सरकार पडल्यानंतर जागतिक नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेले आठ अब्ज डॉलरचे तिसरे कर्ज थांबविले होते. पाकिस्तानला दोन हप्त्यांमध्ये सुमारे दोन अब्ज डॉलर मिळाले होते; पण इम्रान खान यांच्या काळात ते खर्च झाले. यानंतर शाहबाज सरकारचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल बारा जणांच्या शिष्टमंडळासह जागतिक नाणेनिधीच्या दोहा कार्यालयात गेले होते. 18 ते 25 मे अशी सात दिवस तिथे चर्चा झाली.

अर्थव्यवस्था चालविण्यासाठी पाकिस्तानला किमान दोन अब्ज डॉलरची गरज आहे; परंतु तेथून त्यांना हात हलवत परत यावे लागले. पंतप्रधान शाहबाज शरीफ हे पेट्रोल-डीझेल आणि वीज महाग करायला तयार नव्हते. कारण पुढच्या वर्षी पाकिस्तान संसदेची निवडणूक आहे. भाववाढ केली, तर त्याचा फटका बसू शकतो, याची भीती त्यांना वाटत होती. अखेर त्यांचा नाइलाज झाला. त्याचे कारण सरकारकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे जनतेच्या खिशात हात घालण्याशिवाय पर्याय न राहिल्याने त्यांना कठोर निर्णय घ्यावा लागला.

इम्रान यांनी सत्ता सोडताना देशहितापेक्षा सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याला महत्त्व दिले. इम्रान यांना जेव्हा वाटलं की, आपले सरकार जाणार आहे, तेव्हा त्यांनी पुढच्या सरकारसाठी सापळा रचला. जागतिक नाणेनिधी त्या वेळी पेट्रोल आणि डीझेल प्रतिलिटर 25 रुपयांनी महाग करण्याचा सल्ला देत होती. इम्रान खान यांच्या सरकारने तो सल्ला अंमलात आणण्याऐवजी इंधन प्रतिलिटर 10 रुपयांनी स्वस्त केले. वीज 12 रुपये प्रति युनिट महाग करण्याचा सल्ला जागतिक नाणेनिधीने दिलेला असताना इम्रान खान यांच्या सरकारने त्यावर काहीच केले नाही. आता पेट्रोल आणि डीझेल किमान 35 रुपयांनी महाग करा, असे जागतिक नाणेनिधी सांगत आहे, तर विजेचे दरही वाढवण्याचा सल्ला देत आहे.

शाहबाज सरकारने पेट्रोल आणि डीझेलच्या दरात प्रतिलिटर 30 रुपयांची वाढ करून देशाला मोठा धक्‍का दिला. याआधी सरकारला वाटत होते की, त्यांनी इंधन महाग केले तर पुढच्या वर्षीच्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल; परंतु आर्थिक मदतीसाठी जागतिक नाणेनिधीच्या अटी मान्य करण्याशिवाय त्यांच्यापुढं काहीच पर्याय राहिलेला नाही. इंधन दरवाढीसाठी डिसेंबरपर्यंतचा अवधी द्यावा, जेणेकरून कर्ज घेऊन बाकीच्या गोष्टी सुरळीत करता येतील, असा प्रयत्न शाहबाज शरीफ सरकारने करून पाहिला; परंतु त्यात यश आले नाही. पाकिस्तानची परकीय गंगाजळी फक्‍त 12 अब्ज डॉलर्स आहे. यापैकी 9.5 अब्ज डॉलर सौदी अरेबिया, चीन आणि संयुक्‍त अरब अमिरातीचे आहेत. विदेशी ठेवी सरकार खर्च करू शकत नाही.

लॉंगमार्चचा भाग म्हणून इम्रान खान इस्लामाबादला पोहोचले. जोपर्यंत निवडणूक आयोग आणि सरकार निवडणुकीची तारीख जाहीर करत नाही, तोपर्यंत आपण येथून हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. लाहोरमध्ये इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान “तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) समर्थक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. खान यांच्या समर्थकांवर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. पीटीआयच्या समर्थकांनी अश्रुधुराचा परिणाम कमी होईल असे सांगून अनेक झाडे जाळली. ढासळलेली परिस्थिती पाहून आतापर्यंत कथितपणे तटस्थ असलेले लष्करही कृतीत उतरले. गृह मंत्रालयाशी झालेल्या चर्चेनंतर इस्लामाबादच्या बहुतांश भागात लष्कर आणि रेंजर्स तैनात आहेत. शाहबाज शरीफ यांच्या 13 पक्षांच्या आघाडी सरकारने तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी इम्रान खान यांचा पक्ष करत आहे. काळजीवाहू सरकार स्थापन करून लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. संसदेचा कार्यकाळ पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत आहे.

इम्रान यांची समर्थकांसमोरची भाषणे चिथावणी देणारी होती. इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी लॉंग मार्चची घोषणा केली, तेव्हा सरकार गप्प होते. याचं कारण सरकारला बलाढ्य सैन्य साथ देईल की नाही याची खात्री नव्हती. गृहमंत्री राणा सनाउल्ला म्हणाले होते, आमचे हात बांधले गेले आहेत. आम्ही कसे काम करणार? त्यानंतर लष्कराने सरकारला मदत करण्याचे आश्‍वासन दिले. आता बघू इम्रान खान इस्लामाबादच्या रेड झोनमध्ये कसे पोहोचतात, अशी आव्हानात्मक भाषा सरकार वापरायला लागले. गृहमंत्र्यांनी इम्रान यांची संभावना “दहशतवादी’ अशी करून, त्यांना प्रत्युत्तर कसे द्यायचे हे सरकारला चांगलेच ज्ञात आहे, असे ते म्हणाले.

इम्रान खान यांचे अमेरिकेविरोधातील बरळणे अजूनही सुरूच आहे. माझे सरकार पाडण्यात अमेरिकेचा हात होता. या चोरांनी (शरीफ सरकार) देश काबीज केला आहे. मला आशा आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि लष्कर सत्याच्या बाजूने उभे राहतील. लष्कर आता तटस्थ आहे, असे म्हणता येणार नाही. मी पुन्हा सांगतो की, आम्ही जिहाद करण्यासाठी बाहेर पडलो आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे. लाहोरमधील पीटीआय नेत्यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला.

यादरम्यान झालेल्या चकमकीत एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला. त्यानंतरच लष्कराने सरकारला कारवाईचा हिरवा कंदील दिला. याआधी लष्कर हे थेट खान यांच्या दबावाखाली दिसत होते. आता सरकार आणि लष्कराचीही कसरत सुरू आहे. असंख्य संकटे आ वासून उभे असताना इम्रान खान हे सरकारला आंदोलन करून जेरीस आणताना दिसत आहेत. या सर्व घडामोडी पाहता बुडत्याचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हे असल्याचे पाकिस्तान बाबत दिसत आहेत.

Tags: Double problem facingeditorialeditorial page articlePakistan

शिफारस केलेल्या बातम्या

पाकिस्ताननंतर जम्मूमधील चीनची नकारघंटा; “जी 20’ची बैठक जम्मू काश्‍मीरमध्ये घेण्याला विरोध करत म्हणाले…
Top News

पाकिस्ताननंतर जम्मूमधील चीनची नकारघंटा; “जी 20’ची बैठक जम्मू काश्‍मीरमध्ये घेण्याला विरोध करत म्हणाले…

2 days ago
आता भारतभर मान्सूनचे आगमन
अग्रलेख

आता भारतभर मान्सूनचे आगमन

2 days ago
अबाऊट टर्न – “फ्लोअर’टेस्ट
अग्रलेख

अबाऊट टर्न – “फ्लोअर’टेस्ट

2 days ago
मंथन – क्रिप्टोचा गडगडाट
संपादकीय

मंथन – क्रिप्टोचा गडगडाट

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

विधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’

माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस

अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक ! दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त

शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण ?

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..! पहा व्हिडिओ

कर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार!

“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”

Most Popular Today

Tags: Double problem facingeditorialeditorial page articlePakistan

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!