Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

मुंबई वार्ता : शिवशक्‍ती व भीमशक्‍तीचा बोलबाला?

- राजेश पुरंदरे

by प्रभात वृत्तसेवा
January 31, 2023 | 5:40 am
A A
मुंबई वार्ता : शिवशक्‍ती व भीमशक्‍तीचा बोलबाला?

शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युती झाल्यानंतर शिवशक्‍ती व भीमशक्‍तीवरून राजकीय वर्तुळात व प्रसारमाध्यमांत ते एकत्रित आल्याचे चित्र भासवले गेले. ही शक्‍ती प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या राजकारणावर किती प्रभाव टाकणार?

शिवसेना-वंचितची दखल घेत “किंचित आणि वंचित’ एकत्र आल्याची संभावना भाजपने केली, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपणास काहीही माहिती नाही, असे सांगत महाविकास आघाडीत वंचित समावेशाबाबत कानावर हात ठेवले. मनसेने तर दखलपात्रही नाही सांगत युतीच्या भवितव्यावरच बोट ठेवले. त्यामुळे भाजपने उडवलेली खिल्ली योग्य व माफक असल्याची चर्चा सकाळच्या थोड्याशा गारव्यात चहाचा आस्वाद घेत नागरिकांमध्ये होऊ लागली.

शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर वंचितचे प्रकाश आंबेडकरांबरोबर उद्धव ठाकरेंचे संबंध रंगू लागले. “नवा भिडू नवा राज’ अशी समीकरण प्रसारमाध्यमांच्या समोर आणाभाका घेत जुळू लागली. सुरुवातीला थोडी का-कू करत दोन पावले सोयीने पुढे-मागं होत होती. परंतु नंतर काही दिवस लोटताच मनाचा हिय्या करून शिवसेना व वंचित यांनी निवडणुका एकत्रित लढणार असे जाहीर केले. ही युती फक्‍त त्यांच्या दोघांपुरतीच मर्यादित असल्याचे स्वत: उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टही केलेलं होतं. तरीही दोघांच्या युतीवरून राजकीय वर्तुळात नको तेवढे प्रश्‍न उपस्थित झाले. एवढे दिवस तीन चाकांची रिक्षा चार चाकांची मविआ बनली वगैरे चर्चा रंगली. भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या युती सरकारविरोधी ही गाडी राज्यभर सुसाट धावणार वगैरे स्वप्न दाखवली गेली. तसेच राज्यभर शिवशक्‍ती व भीमशक्‍ती एकत्रित आली वगैरे पूर्वीचे दाखले देत नारे दिले जाऊ लागले.

तथापि शिदेंच्या बंडांनतर गलितगात्र होऊ लागलेली किंवा मोडकळीला आलेली उरली सुरली किंवा शिलकी शिवसेनाही अशी तशी कशाला सोडा? या हेतूने किंवा तसे उद्दिष्ट ठेवून राजकारण करणाऱ्या भाजपने शिवसेनेसह उद्धव ठाकरे व मातोश्रीचे स्थानच नष्ट करण्याकरिता त्यांच्यावर घणाघात घालायला सुरुवात केली. आधी शिलकी शिवसेना संबोधणारे भाजपा नेते शिवसेनेला किंचित असे हिणवत “किंचित व वंचित’ एकत्रित आल्याची टीका करून आणखीन धोपटून काढायला लागले. त्यांच्या या टीकेमुळे दरवेळेस पेटून उठणारी शिवसेना मशाल हाती धरून वणवा न पेटवता, दुबळ्या, जर्जर झालेल्या वाघासारखी समोर फेकलेल्या शिकारीवर तुटून पडू शकली नाही. संजय राऊतांनी थोडाफार प्रतिकार करून पाहिला परंतु त्यांनाही सक्षमपणे बाजू लावून धरणे जमले नाही. तेही मातोश्रीवरच अवलंबून राहिले; पण तिथून हुंकार-देकार काहीच आले नाही. शिवसेनेशी ही स्थिती पाहता जयप्रकाश नारायणांच्या जनता दलाचे जसे छिन्न-विच्छिन्न तुकडे होताना अनेक नेत्यांनी पाहिले तसेच काही काळ वाटले.

पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची ही अवस्था भाजपा किंवा बाळासाहेबांची शिवसेना तुटून पडते म्हणून झाली असे वाटत असेल, तर तसेही म्हणता येणार नाही. शिवसेनेचे सत्तेतील मित्र म्हणजे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या पक्षांनीही स्वत:चे गेल्या अडीच वर्षातील राजकारण करत केली आहे. पण भाजपच्या बरोबरच्या रस्सीखेचीच्या राजकारणांत उद्धव ठाकरे हे सर्व विसरले. पण त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस शिवसेनेला त्यांच्या मविआच्या घोळातून सहजासहजी निसटू देणार नाहीत. वंचितबरोबर युती करताना शिवसेनेने आम्हाला विचारले नाही. हे आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने अनेकवेळा राजकीय पटलावर पिटून काढत ठाकरेंची शिवसेना मविआसह निवडणुकांत भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेविरुद्ध लढेल असा विश्‍वास ते देत राहिले. पण त्यात कितपत तथ्य आहे हे मविआत आतापर्यंत एकत्रित दिसणारे हे पक्ष ठामपणे ग्वाही देत नव्हते, हेही तितकेच प्रखरपणे जाणवते.

या सर्व राजकारणात नाममात्र अस्तित्व ठेवणारी राज ठाकरेंची मनसेही शिवसेनेवर तोंडसुख घेत आहे. मनपात भ्रष्टाचार झाला. मातोश्रीचा त्यात हात वगैरे आरडाओरडा करत सगळ्यांचे लक्ष वेधत शिवसेनेऐवजी हिंदुत्वाचे कैवारी आम्हीच असे छाती पिटत पुढे येत शिवसेना-वंचित काहीच नाही, ही शिवशक्‍ती-भीमशक्‍ती नुसतीच बोलबाला वगैरे टीका करत राहिले. मनसेचे प्रवक्‍ते संदीप देशपांडे तर शिवसेनेला इतके घालून पाडून बोलू लागले. सुरुवातीला सगळ्याच राजकीय पक्षांचा समाचार घेणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या रणरागिणी किशोरी पेंडणेकर व मनीषा कायंदेही नंतर गप्पच झाल्या. काही काळानंतर मीडियालाच त्या दोघीही टाळू लागल्या. त्यामुळे जर्जर झालेला ठाकरेंच्या शिवसेनेचा वाघ हा वंचितच्या खांद्यावर पुढे जाताना दिसला. तेव्हा कुणाच्या खाद्यांवर कुणाचे ओझे? हे गाणे आपसूकच ओठावर आले.

पण शिवसेना-वंचित युतीमुळे वंचित इतकी जोरात आली की, लोकसभा निवडणुकांत वंचित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपाबरोबर युती करण्याची स्वप्न रंगवू लागले. त्यांना भाजपने लगेच आवतणं देत आवजाव घर तुम्हारा असे दाखवून दिले नाही. त्यांनी सोयीने या सगळ्यावर मौन बाळगले. कदाचित ही त्यांची समयसूचकता असू शकते किंवा आरपीआयच्या रामदास आठवलेंना काही काळ बाजूला करून प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा वापर करत जास्त जागा महाराष्ट्रात निवडून आणण्याची चाल असू शकते, ते नाकारता येणार नाही.

परंतु भाजप हिणवत असेलेली किंचित-वंचित युती मुंबई व ठाणे मनपा निवडणुकांत खरंच किंचित दिसणार का? की नुसतेच मनसे म्हणते तशी शिवशक्‍ती व भीमशक्‍ती प्रयोग ही बला नाही तर नुसताच बोलबाला ठरणार का? की भाजपच्याबरोबर युती करणारी बाळासाहेबांची शिवसेना विसर्जित करून पुलोद कॉंग्रेसमध्ये विसर्जित झाली होती अगदी तशीच भाजपात विलीन करून होणार का? या प्रश्‍नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढील मुंबई दौऱ्यात मिळण्याची शक्‍यता आहे.

Tags: editorial page articleprakash ambedkarUddhav Thackeray

शिफारस केलेल्या बातम्या

महाविकास आघाडीच्या बॅनरवरून राहुल गांधींचा फोटो गायब ? शरद पवारांपासून ते नाना पटोलेंपर्यंत सर्व नेत्यांचे फोटो पण..
Top News

महाविकास आघाडीच्या बॅनरवरून राहुल गांधींचा फोटो गायब ? शरद पवारांपासून ते नाना पटोलेंपर्यंत सर्व नेत्यांचे फोटो पण..

2 days ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : फंड, पेन्शन यावर जप्ती आणता येणार नाही
संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : आगरवाल समाज हुंडा घेणार नाही

2 days ago
रणजित सावरकर यांची मागणी,”राहूल गांधींनी जाहीर माफी मागावी अन्यथा… “
Top News

रणजित सावरकर यांची मागणी,”राहूल गांधींनी जाहीर माफी मागावी अन्यथा… “

3 days ago
“शिंदे गटाने शिवसेनेचे “धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह 2000 कोटी रुपयांना विकत घेतले”, दिल्ली हायकोर्टाचे उद्धव, आदित्य आणि राऊत यांना समन्स
Top News

“शिंदे गटाने शिवसेनेचे “धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह 2000 कोटी रुपयांना विकत घेतले”, दिल्ली हायकोर्टाचे उद्धव, आदित्य आणि राऊत यांना समन्स

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले,”…तर हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील ठरेल”

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नव्या संसद भवनाला अचानक भेट; कामगारांशी संवाद साधत कामाची केली पाहणी

‘गोदावरी’ची धडाकेबाज कामगिरी, फिल्मफेअरमध्ये मिळवले स्थान

‘पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव ? अजित पवार यांनी त्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न..’

कोरोना वाढतोय ! दुसऱ्या दिवशीही सापडले तीन हजारांहून अधिक रुग्ण

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; ‘या’ प्रकरणात आरोपपत्र दाखल होणारे ठरले पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष; म्हणाले,”माझा राजकीय छळ”

छत्रपती संभाजीनगर : हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

पाण्याखाली शंभर दिवस राहण्याचा प्रयोग ; साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसरचा उपक्रम

सभागृहात पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदारावर संतापले अभिनेता प्रकाश राज, म्हणाले…

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर

Most Popular Today

Tags: editorial page articleprakash ambedkarUddhav Thackeray

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!