विशाल गोमंतक हाच सीमावादावर तोडगा
नाशिक, दि. 26 – महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील सीमावादावर विशाल गोमंतकाची स्थापना हा एकच सन्माननीय तोडगा आहे, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. खूप पूर्वी शिवसेनेने अशी सूचना केंद्र सरकारला केली होती, असे सांगून ठाकरे यांनी असा इशारा दिला की, या बाबतीत केंद्र सरकारने लवकर कृती केली नाही तर पक्षाला रस्त्यावर यावे लागेल.
बाटलीचे दूध अर्भकांना घातक
लंडन – विकसनशील राष्ट्रांतील गरीब स्त्रियांना मुलांना पावडरचे दूध पाजावे लागते. परंतु त्यांचे जवळ बाटल्यांतील दूध जंतुरहित करण्याचे तंत्र व सोयी उपलब्ध नसतात. त्यामुळे कृत्रिम दूध अर्भकांना घातक ठरते.
सेंद्रीय खतांकडे दुर्लक्ष नको
भोपाळ – रासायनिक खते वापरण्यावर जादा भर देण्यात येतो. त्यावर केंद्रीय कृषि व पाटबंधारे मंत्री जगजीवनराम यांनी टीका केली. आणि सांगितले की, सेंद्रीय खतांचाही वापर होणे आवश्यक आहे.
हिंदी भाषेला बहुजन भाषेचे स्थान मिळावे
नागपूर – आज सर्व लोकांना समजेल अशी भाषा इंग्रजी झाली आहे. तिच्या तावडीतून बहुजन भाषा सोडवाव्यात व तिची जागा हिंदी भाषेला मिळावी.
घरात खायला नाही, तरीपण शेतकऱ्यांवर खटले भरले
सासवड – पुरंदर तालुक्यात सक्तीने धान्य लेव्ही वसुली चालू असून लेव्ही न भरणाऱ्या सामान्य 200 शेतकऱ्यांवर खटले भरले आहे. शेतकऱ्यांना खाण्यास अन्न नाही ते लेव्ही
कशी भरणार?