जनता पक्षाच्या ध्वजावर हलधराचे चित्र
नवी दिल्ली, दि. 29 – जनता पक्षाचा ध्वज केशरी व हिरव्या रंगात असेल आणि त्यावर मध्यभागी नांगर धरलेल्या शेतकऱ्याचे (“हलधरा’चे) चित्र असेल, असे आज पक्षाचे चिटणीस सुरेंद्र मोहन व रामधन यांनी येथे सांगितले. (हलधर हे भारतीय लोकदलाचे निवडणूक चिन्ह आहे)
सुरेंद्र मोहन व रामधन पुढे म्हणाले, जनता पक्षाच्या राज्य पातळीवरील समित्यांनी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश व कर्नाटक या राज्यांत कार्यास सुरुवात केली आहे. हळूहळू सर्वच राज्यात कार्यास सुरुवात केली जाईल.
कर्जमुक्ती कायदा ः आता वेगाने अंमलबजावणी
मुंबई – महाराष्ट्र सरकारचा 1976चा कर्जमुक्ती कायदा घटनेला धरूनच असल्याचा जो निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, त्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी स्वागत केले. ते म्हणाले, आता या कायद्याची आम्हाला पूर्ण वेगाने अंमलबजावणी करता येईल.
सरन्यायाधीशांचा शपथविधी
नवी दिल्ली – नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मिर्झा हमीदुल्ला बेग यांचा शपथविधी आज राष्ट्रपती भवनात पार पडला. राष्ट्रपती अहमद यांनी बेग यांना शपथ दिली.