युरेनियम, फॉस्फेट साठे मध्यप्रदेशात सापडले
भोपाळ, दि. 9 – युरेनियमचे मोठे प्रमाण असलेले “फॉस्फेट रॉक’ खनिजाचे साठे मध्यप्रदेशात आढळून आले आहेत. इतक्या चांगल्या दर्जाचे युरेनियम असलेले फॉस्फेटयुक्त खडक जगात दुसरीकडे आढळलेले नाहीत. अणुशक्ती आयोगाच्या खनिज विभागाच्या शास्त्रज्ञांनी राज्यातील छत्रपूर व सागर जिल्ह्यात बिजावर डोंगरांच्या रांगांत हे खडक शोधून काढले.
आतापर्यंत फक्त मोरोक्को व अल्जीरियामध्ये फॉस्फेटिक खडकांत युरेनियम सापडल्याची नोंद आहे. मध्य प्रदेशातील या खनिजामुळे युरेनियम मिळेलच, परंतु खते व फॉस्फॉरिक ऍसिड तयार करण्यासाठी फॉस्फेटही मिळेल.
साम्राज्यवादी वृत्ती अजून नष्ट झालेली नाही
पोर्ट लुईस – साम्राज्यवाद जरी संपुष्टात आला असला तरी साम्राज्यवादाचा उगम ज्या मनोवृत्तीतून झाला, ती वृत्ती अजून नष्ट झाली नाही, असे उद्गार पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काढले. वर्चस्व गाजविण्याची ईर्ष्या, इतरांकडून फायदे उठविणे, इतरांना भरीस घालूस थोड्या काळात फायदे उठविणे या वृत्ती अजून जिवंत आहे.
गरिबी हा क्षयरोग!
पुणे – “गरिबी ही गोळी घेऊन डोकेदुखी थांबण्याइतका सोपा रोग नाही की कर्करोगाइतका गंभीर नाही. मात्र निदान आणि उपचार या अभावी वर्षानुवर्षे खितपत पडणारा हा क्षयरोग आहे’, गरिबीची अशी मीमांसा कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.