-सत्यवान सुरळकर
नू.म.वी.प्रशालेतील निवृत्त विज्ञान शिक्षक आणि एम.आय.टी. कोथरूड येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलचे प्राचार्य अनिल दांडेकर यांचे “अमृत महोत्सवा’ निमित्ताने “अमृत संचय’ पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. यामध्ये दांडेकरांचे विविध क्षेत्रांतील 75 विद्यार्थी आणि 75 स्नेही, हितचिंतक यांचा परिचय करून दिला आहे.
विज्ञान व क्रीडा लेखक, मुलाखतकार, सिम्बायोसिसच्या परदेशी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम संयोजक, शैक्षणिक सहली, रक्तदान शिबिरे आयोजन, आपत्ती व्यवस्थापन व्याख्याते अशा वेगवेगळ्या विभागांमधील कार्यकर्ता म्हणून आलेले अनुभव पुस्तकात आहेत.
दांडेकरांनी भारतभर आणि 15 देशांमध्ये प्रवास केला. त्यातील निवडक फोटोंचा “जगप्रवास’ या विभागात समावेश केला आहे. या पुस्तकात त्यांचे विद्यार्थी, स्नेहीनी उत्कृष्ट गुणांचे संकलन करून आगळावेगळा “शैक्षणिक प्रकल्प’ साकारलेला आहे.