नवी दिल्ली -दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ईडीने नव्याने समन्स बजावले आहे. त्यांना चौकशीसाठी ३ जानेवारीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना सर्वप्रथम २ नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावले.
मात्र, ते गैरहजर राहिल्याने त्यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी २१ डिसेंबरला बोलावण्यात आले. दुसऱ्या वेळीही केजरीवाल यांनी ईडीसमोर हजर राहण्याचे टाळले. ते २० डिसेंबरला १० दिवसांच्या पूर्वनियोजित विपश्यनेसाठी पंजाबला रवाना झाले.
त्यामुळे त्यांना ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. ईडीचे समन्स अवैध आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या निर्देशावरून ते बजावण्यात आल्याची भूमिका केजरीवाल यांनी घेतली आहे.