PMC Bank Scam : आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर ईडीचे छापे

मुंबई – बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणात ईडी म्हणजेच सक्‍तवसुली विभागातर्फे छापे घालण्यात आले आहेत. ठाकूर यांचा विवा ग्रुप हा उद्योग समूह असून त्यांच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर आज ही छापेमारी करण्यात आली.

मुंबई आणि वसई विरार येथील ही ठिकाणे आहेत. पीएमस बॅंक घोटाळा प्रकरणात एचडीआयएल कंपनीचा संबंध आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपचे या कंपनीशी असलेल्या कथित संबंधांचे पुरावे गोळा करण्यासाठी ही छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे एकूण तीन आमदार असून या तिन्ही आमदारांचा सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला पाठिंबा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.