कोलकाता – मनरेगा निधीच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सकाळी पश्चिम बंगालमधील अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.
सॉल्ट लेकच्या आयए ब्लॉकमध्ये माजी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला, तर एजन्सीचे कर्मचारी हुगळी जिल्ह्यातील चिनसुरा येथील एका व्यावसायिकाच्या घराची आणि कार्यालयाची देखील झडती घेताना आढळले. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर येथील राज्य सरकारी कर्मचाऱ्याशी संबंधित असलेल्या मालमत्तेचीही झडती घेण्यात आली.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा मध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झालच्या तक्रारी आल्यानंतर ही छापेमारी केली जात असल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले. मनरेगा कामासाठी बनावट जॉब कार्ड तयार केली गेली असाही आरोप आहे.