Srikant Shinde । भाजप नेते तथा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह नुकताच महाराष्ट्र दौरा केला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शाह यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला गेला. या दौऱ्यादरम्यान महायुतीची जागावाटपावरून बैठकही झाली मात्र यावेळी जागावाटपाचा तिढा सुटला नाही त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक दोन नव्हे तर तीनदा नवी दिल्ली येथे जागा वाटपाच्या प्रश्नावरून अमित शाह याची भेट घेतली.
यावरून आता जागावाटपावरून महायुतीत वेगवेगळे दावे केले जात आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पण तरीसुद्धा भाजप 30 ते 32 जागांवर, शिवसेना शिंदे गट 10 ते 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 4 ते 6 जागांवर निवडणूक लढवेल, अशी चर्चा सुरु आहे. पण जागावाटपाच्या फॉर्म्युलावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.
अशात आता नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून नाशिकमध्ये खासदार हेमंड गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रभू रामाचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
Shrikant Shinde । नेमकं काय म्हणाले श्रीकांत शिंदे
‘ हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं आहे,प्रभू रामाचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार असेही ते म्हणाले आहे. नाशिकमध्ये आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितीत लावली. या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली.
Shrikant Shinde । नाशिकची जागा भाजपला हवी ?
मिळालेल्या माहितीनुसार,हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं आहे अशी मोठी घोषणा श्रीकांत शिंदे यांनी केली असली तरी भाजप पक्षाला देखील नाशिक लोकसभेची जागा हवी आहे. भाजपमधील काही नेत्यांना नाशिक येथून लोकसभेसाठी तिकीट हवं आहे. तर गेल्या १० वर्षाचा इतिहास बघता नाशिक लोकसभेवर हेमंत गोडसे हे गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत. महायुतीच्या जागावाटपावरुन सुरु असलेल्या विविध चर्चांमुळे हेमंत गोडसे यांची धाकधूक वाढली होती. आपलं लोकसभेचं तिकीट कापलं जाणार तर नाही ना? अशी हेमंत गोडसे यांना धाकधूक असल्याची चर्चा होती. पण आता थेट श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केल्याने हेमंत गोडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र भाजप आणि शिंदे गटात या जागेवरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे वाचाल का ? वसंत मोरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसे नेत्याकडून बुटाचा फोटो पोस्ट