प्रफुल पटेलांच्या अडचणी वाढणार, ईडीने पाठवली दुसरी नोटीस

नवी दिल्ली 8 जून : विमान खरेदी घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होणार आहे. या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीने पटेल यांना दुसरी नोटीस पाठवली आहे. युपीए सरकारच्या काळात एअर इंडियासाठी झालेल्या विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. त्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी ईडीने तत्कालिन विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांना चौकशीसाठी नोटीस पाठविल्याची ईडीने म्हटलं आहे.

त्यानुसार “ईडी’ने त्यांना चौकशीसाठी पुढील आठवड्यात येण्यास सांगितले आहे. 10 किंवा 11 जून रोजी चौकशीसाठी हजर होण्याची सूचना “ईडी’ने पटेल यांना केली आहे.

दरम्यान, याआधीही पटेलांना 6 जून रोजी रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस पाठवली होती, मात्र माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल सक्‍तवसुली संचलनालयाच्या चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. काही वैयक्तिक कामामुळे आपण चौकशीला उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी “ईडी’ला कळवले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.