नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील विभाजनवादी शबीर शाह यांची पत्नी बिल्कीस शाह यांच्या यांना सक्तवसुली संचलनालयाने 2005 मधील मनी लॉन्डरिंग प्रकरणी आरोपी केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याच्या हेतूने दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याप्रकरणी शबीर शाह आणि हवाला मध्यस्थ मोहम्मद अस्लम वाणी यांच्या दरम्यानच्या व्यवहारात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
‘ईडी’ने बुधवारी याप्रकरणी सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रामध्ये बिल्कीस शाह यांना आरोपी केले गेले आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी निश्चित केली आहे.
बिल्कीस शाह आणि शबीर शाह यांना अस्लम वाणी याच्याकडूड 2.08 कोटी रुपये मिळाले असल्याचे ‘ईडी’ने आपल्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. सर्व रक्कम रोख स्वरूपात शबीर अहमद शाह आणि डॉ. बिल्कीस शाह यांना तीन टप्प्यात दिली असल्याचे अस्लम शाह याने कबूल केले आहे.
शबीर शाह यांचे उत्पन्नाचे निश्चित माध्यम माहीत नाही आणि हे पैसे अवैध मार्गांमधून मिळालेले आहेत, असे बिल्कीस शाह यांना माहीत असल्याचे ‘ईडी’ने आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.