नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाच्या झटक्याची नोंद झाली असल्याची नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेशातील धर्मशालापासून 22 किमी पूर्वेला पहाटे 5:17 वाजता 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. याबाबत सध्या अधिक माहिती समोर आलेली नाही. याआधी 5 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता. जम्मू आणि काश्मीरमध्येही भूकंपाचे झटके बसले होते. तेथे 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदू कुश परिसरात होते.
An earthquake with a magnitude of 3.2 on the Richter Scale hit 22km East of Dharamshala, Himachal Pradesh at 5:17 am today: National Centre for Seismology pic.twitter.com/WPj0JWi47y
— ANI (@ANI) January 14, 2023
2023 नववर्षाच्या पहिल्या दिवशीही देशात वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते. 1 जानेवारी रोजी रात्री 11:28 वाजता मेघालयमधील नोंगपोह येथे 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू नॉन्गपोहमध्ये जमिनीपासून 10 किमी अंतरावर होता. त्यापूर्वी 27 आणि 28 डिसेंबरच्या रात्री अडीच तासांच्या आत उत्तराखंडमधील उत्तरकाशीपासून नेपाळपर्यंत अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते.
नेपाळमधील बागलुंग जिल्ह्यात भूकंपाचा पहिला धक्का जाणवला होता. त्यानंतर भूकंपाचा दुसरा धक्का खुंगाच्या आसपास परिसरात जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.3 स्केलवर नोंदवली गेली होती.