पुणे – शहरातील कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, शनिवारी (दि. 7) कमाल तापमानात 34 अंश सेल्सियसवर पोहचले आहे. त्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहे. दिवसभर उन्हाचा बसत असला तरी पहाटे धुक्याची पसरलेली चादर पुणेकरांना दिलासा देणारी आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस गेला आणि शहरात ऑक्टोबर “हिट’ वाढू लागली. दिवसभर ऊन आणि उकाडा तर रात्री गारवा यामुळे शहरात पुन्हा वातावरण बदल आहे. दरम्यान, पहाटे काही भागात धुक्यांचा गालिचा पसरलेल्याचे दिसून येते. त्यामुळे आता थंडीचीही चाहुल लागली असून, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर फिरणारे नागरिक स्वेटर, कानटोपी घालून बाहेर पडत आहे. दोन दिवसांपूर्वी 30 अंशांवर असलेले कमाल तापमान 48 तासांत 4 अंशांनी वाढले. दरम्यान, पुढील दोन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यत आहे.