काही दिवसांपूर्वी वरुण धवन आणि नताशा दलालचे लग्न झाले. त्यानंतर श्रद्धा कपूरच्याही लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. श्रद्धा कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठ यांच्यातील अफेअर आता सर्वांना माहिती झाले आहे. हे दोघे लग्न करणार आहेत, अशी चर्चाही रंगायला लागली होती. पण ते लग्न “कधी’ करणार हे मात्र समजू शकलेले नाही. दिल्लीवरून मुंबईला परतल्यानंतर विमानतळावरच पत्रकारांनी या विषयावरून श्रद्धाला छेडलेच.
पण तिची रिऍक्शन खूपच विचित्र होती. तिने चक्क लग्नाचा विषयच झटकून टाकला. “तुम्ही काही पण विचारता.’ असे म्हणून तिने प्रश्नाचे उत्तरच दिले नाही. आश्चर्य म्हणजे पत्रकारांना श्रद्धाने चक्क मराठीत हे उत्तर दिले होते. रोहन श्रेष्ठ हा देखील बॉलिवूडच्या सेलिब्रिटी वर्ल्डमध्ये ओळखला जातो. वरुण धवन आणि नताशा दलाल यांना त्याने लग्नाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली होती.
त्याच्या कॉमेंटवर वरुणनेही रोहन आणि श्रद्धाच्या लग्नाबाबत सूचक प्रतिक्रिया दिली होती. ‘पुढचा नंबर तुमचाच आहे.’ असे तो म्हणाला होता. त्याच्या म्हणण्यानुसार कदाचित श्रद्धाच्या लग्नाची चर्चा सुरू असेलही. पण श्रद्धा ते मान्य करायला तयार नाही. श्रद्धा आणि रोहन हे केवळ लहानपणीचे मित्र आहेत, यापेक्षा काही नाही असे श्रद्धाचे पप्पा शक्ती कपूरनेही म्हटले आहे.