नवी दिल्ली – आठवडाभरापासून सुरू झालेले इंधन दरवाढीचे सत्र सोमवारीही कायम राहिले. लिटरमागे पेट्रोलच्या दरात 30 पैशांची, तर डीझेलच्या दरात 35 पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आठवडाभरात पेट्रोल 4 रूपयांनी, तर डीझेल 4 रूपये 10 पैशांनी महागले.
सार्वजनिक इंधन कंपन्यांनी साडेचार महिने पेट्रोल आणि डीझेलचे दर जैसे थे ठेवले होते. त्यानंतर 22 मार्चला पहिल्यांदा दरवाढ झाली. तेव्हापासून 7 दिवसांत 6 वेळा दरवाढ झाली. सार्वजनिक कंपन्यांनी केलेली दरवाढ संपूर्ण देशात लागू होते. मात्र, स्थानिक कराचे प्रमाण वेगवेगळे असल्याने प्रत्येक राज्यात वेगवेगळा दरबदल होतो.
देशाची राजधानी दिल्लीत आता पेट्रोलचा दर शंभरीच्या उंबरठ्यावर (99.41 रूपये) जाऊन पोहचला आहे. तर, डीझेलचा दर 90.77 रूपये इतका झाला आहे.