#budget2021 : महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त निराशा

संजय राऊत यांनी दिली केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

नवी दिल्ली –  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021 -22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प ( सोमवारी ) आज  संसदेत सादर केला आहेत. अर्थसंकल्प “कधी नव्हे इतका चांगला’ असणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देत सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी त्या काय करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.  यावर आता  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मत  व्यक्त केले आहे.

संजय राऊत म्हणाले,’ हा कुठल्याही पक्षाचा अर्थसंकल्प नसून हा देशाचा अर्थसंकल्प आहे. आजच्या अर्थसंकल्पावरून असं दिसून आले की पक्षाचं निधीवाटप सुरू आहे ?  ते पुढे म्हणाले देशाला सर्वात जास्त महसूल महाराष्ट्र व मुंबईतूनआकडे अर्थमंत्री देत आहेत मिळतो मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात  महाराष्ट्राला काहीही मिळालेल नाही. या आकडे अर्थमंत्री देत आहेत. मात्र त्यातले किती आकडे खरे ?  आणि किती खोटे ? हे येत्या  सहा महिन्यात कळेल. असं म्हणत  संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

तत्पूर्वी, केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राच्या वाट्यातील जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्यावेत. म्हणजे आम्हाला कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था बाहेर काढता येईल. तसेच  सर्व सामान्यांना कोरोनाची लस मोफत देण्यासंदर्भातही विचार झाला पाहिजे.’  अशी अपेक्षा संजय राऊत यांनी  व्यक्त केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.