जळगाव – उद्धव ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेचं नेतृत्व करताहेत. यादरम्यान अंधारे शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. जळगावमध्ये असताना देखील सुषमा अंधारे यांनी थेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर भाषेवरून निशाणा साधला.
गुलाबराव पाटील गद्दारीचा शिक्का घेऊन फिरत आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे परंतु त्यावर पाटील काहीही बोलत नाहीत. कसे बोलतील त्यासाठी अभ्यास असावा लागतो असा टोलाही अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतून पाटील यांना लगावला. सुषमा अंधारे या सध्या उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडत ठीक ठिकाणी महाप्रबोधन यात्रा काढताहेत.
सुषमा अंधारे यांनीं यावेळी गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांचा देखील समाचार घेतला. त्या म्हणाल्या,गुलाबराव पाटील माझा बाई म्हणून एकेरी उल्लेख करतात,मी मात्र तुमचा सतत भाऊ म्हणून उल्लेख करते. तरीही तुम्ही माझा एकेरीच उल्लेख करता ही कोणती पद्धत आहे ? असा सवाल अंधारे यांनी यावेळी उपस्थित केला. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करून उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाप्रबोधन यात्रेला सुरुवात केली आहे त्यासाठी त्या राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहेत.