वॉशिंग्टन : भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5.32 वाजता फ्लोरिडाच्या केनडी स्पेस सेंटरमधून काही नागरिकांनी अवकाशात यशस्वी झेप घेतली. यांच्या समवेत एलन मस्क यांची अमेरिकन एरोस्पेस कंपनी ‘स्पेसएक्स’च्या फाल्कन 9 रॉकेटच्या साह्याने अवकाश गाठले. स्पेसएक्सच्या यानाला ‘इन्स्पिरेशन 4’ रॉकेट असे नाव दिले गेले आहे.
View from Dragon’s cupola pic.twitter.com/Z2qwKZR2lK
— SpaceX (@SpaceX) September 16, 2021
या यानातील 4 नागरिक 3 दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहेत. हे नागरिक पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन 357 मैल उंचीवर प्रवास करत आहेत. 2009 नंतर पहिल्यांदाच सर्वसामान्य नागरिक इतक्या उंचीवर पोहचला आहे. या मोहिमेचे नेतृत्व 38 वषीय इसॅकमॅन करत आहेत. त्यांच्यासोबत हेली अर्केनो आणि अमेरिकेच्या हवाई दलात वैमानिक राहिलेले ख्रिस सेम्ब्रोस्की आणि 51 वषीय शॉन प्रॉक्टर आहेत.