काकडेंच्या भूमिकेमुळे विखे समर्थक अस्वस्थ

विनवण्या करूनही काकडे राष्ट्रवादीच्या गोटात
नगर –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक व भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक ऍड. शिवाजीराव काकडे यांच्यासह त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे अचानक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात गेल्याने विखेंना हा जोरदार धक्‍का मानला जात आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले व काकडे यांच्यात छत्तीसचा आकडा असतांनाही आज राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर काकडे आल्याने घुलेंची ताकद वाढली आहे.

दरम्यान, काकडे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा देवून नये म्हणून विखे गटाकडून जोरदार प्रयत्न झाले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात काकडे यांनी राष्ट्रवादीचे उपरणे खांद्यावर घेतले. अर्थात काकडे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून विधानसभेसाठी इच्छुक आहे. परंतु त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यास टाळाटाळ झाली. गेल्यावेळी शिवाजीराव काकडे यांना उमेदवारी निश्‍चित करण्यात आली होती. ते तयारी लागले होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार तो भाजपने आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काकडे तेव्हापासून भाजपवर नाराज आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभेनंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्वतंत्र जनशक्‍ती मंडळाच्यावतीने उमेदवारी करून विजय मिळविला होता. भाजपकडून वारंवार उमेदवारीसाठी डावलेले जात असल्याने काकडे नाराज होते. काकडे हे भाजपमध्ये असले तरी विखेंचे कट्टर समर्थक आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत काकडे दाम्पत्य हे विखेंबरोबर राहिल असे गृहीत धरण्यात येत असतांना अचानक आज काकडे यांनी आपली भूमिका बदलून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विखेंची कोंडी झाली आहे. ज्या शेवगावमध्ये काकडे म्हणजेच विखे अशी समीकरण होते. ते आज बदलले आहे. शेवगावमध्ये काकडे व घुले यांच्यात कधीत पटले नाही. यांच्यात नेहमी संघर्ष होत. परंतु घुलेंनी केलेल्या मध्यस्थीमुळे काकडे आज घुलेंच्या बरोबरीने राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. काकडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नसला तरी घुलेंच्या दृष्टीने आज काकडे या जमेच्या बाजू झाल्या आहेत.

काकडे यांच्या भूमिकेमुळे विखे समर्थक मात्र अस्वस्थ झाले आहेत. आजवर काकडे यांनी कधीही विखेंना सोडले नाही. दरवेळी काकडे यांनी विखेंना साथ दिली आहे. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष शालिनी विखे यांना काकडे यांनी मतदान केले. पण त्यावेळी उपाध्यक्षपदासाठी असलेल्या उमेदवार राजश्री घुले यांना मात्र मतदान करण्याचे त्यांनी टाळे. एवढा घुले व काकडे यांचा संघर्ष असतांना आज तो या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मावळला असल्याचे चित्र दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.