मुंबई – गेल्या काही दिवसात रुपयाचे मूल्य कमी होत असल्यामुळे भारताकडे असलेल्या परकीय गंगाजळीच्या मूल्यात घट झाली आहे. 13 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय भारताकडील परकीय गंगाजळीचे मूल्य 619 अब्ज डॉलर इतके झाले आहे.
परकीय चलानाशिवाय भारताकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यात घट झाली असून या कालावधीत भारताकडे 36 अब्ज डॉलर मूल्याचे सोने होते. या आठवड्यात परकीय चलनाच्या मूल्यामध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी भारताकडे असलेल्या परकीय चलन साठा तुलनेने जास्त आहे. त्यामुळे या साठ्याचा उपयोग करावा अशी मागणी काही वर्गातून होत आहे.