ओतूर (प्रतिनिधी) – दोन दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे ओतूर येथिल मांडवी नदी दुधडी वाहु लागली आहे.
मांडवी नदीचा प्रवाह अतिशय सौंदर्य प्राप्त करित काठच्या झाडीझूडपातून वाहत आहे. नदीला वाढलेल्या प्रथम पाण्याचा आणि तीच्या सौंदर्य प्राप्त रुपाचा गावातील आणि परिसरातील लोकांनी आनंद घेतला.
श्री कपर्दिकेश्वर शिवमंदिराजळ व संतश्रेष्ठ बाबाजी चैतन्य महाराज संजिवन समाधी मंदिराजवळ मांडवी नदिचे चंद्राकार घेतलेले स्वरुप निसर्ग अविष्कार आहे. दोन दिवस संततधार होत असल्याने मांडवी खळखळून वाहात आहे.