ऐतिहासिक तिहेरी तलाक विधेयकाला राज्यसभेने मंजूरी

नवी दिल्ली: तात्काळ आणि तिहेरी तलाक पद्धतीला बेकायदेशीर ठरवणाऱ्या ऐतिहासिक विधेयकाला आज राज्यसभेने मंजूरी दिली. 99 विरुद्ध 84 मतांनी विधेयक मंजूर झाले. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

तिहेरी तलाकवर बंदीच्या विधेयकावर आज दिवसभर जोरदार चर्चा झाली. मतविभाजनानंतर विधेयकाच्या बाजूने 100 तर विरोधात 84 मते पडल्याचे स्पष्ट झाले. त्यापूर्वी हे विधेयक राज्यसभेच्या प्रवर समितीकडे सोपवण्याचा विरोधकांनी मांडलेला ठराव फेटाळण्यात आला.
दोन्ही सभागृहांची मंजूरी मिळाल्यामुळे आता तिहेरी तलाक बंदी विधेयकावर केवळ राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची औपचारिकता बाकी राहिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.