युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ 8 महिन्यांसाठी निलंबित

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यावर डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करत 8 महिन्यासाठी निलंबित केले आहे.

दरम्यान, सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेदरम्यान पृथ्वीच्या लघवीचा नमुना घेण्यात आला. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी इंदूरमध्ये ही चाचणी घेण्यात आली. यातून पृथ्वीच्या शरीरात टर्ब्युटलाइन असल्याचं निष्पन्न झालं, याअंर्तगत बीसीसीआयनं त्याच्यावर कारवाई केली. तसेच कफ सिरप घेत असताना त्यातून नकळत पृथ्वीच्या शरीरात उत्तेजक द्रव्य गेल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे.

याप्रकरणी पृथ्वीनं ‘माझ्या हातून जाणूनबुजून हे कृत्य घडलेलं नाही. तर कफ सिरप घेताना उत्तेजकद्रव्य माझ्या शरीरात गेलं, असं स्पष्टीकरण बीसीसीआयला दिलं होतं.

हे स्पष्टीकरण बीसीआयला पटलं मात्र तरीही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर 8 महिने निलंबनाची कारवाई केली. निलंबनच्या कारवाईमुळे पृथ्वी शॉ हा 16 मार्च 2019 पासून 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू शकणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.