दारूच्या नशेत पत्नी मारहाण करते; जॅक स्पॅरो भावूक

‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’ चित्रपटातील जॉनी डेप्प यांना जॅक स्पॅरो नामक डाकूच्या भूमिकेने जगभरात प्रसिद्धी मिळाली. जॉनी डेप्प सध्या हॉलिवूडमधील सर्वात महागड्या कलाकारांपैकी एक आहेत. परंतु, सध्या ते आपली घटस्फोटाच्या केसमुळे चर्चेत आहेत. याप्रकरणी जॉनी डेप्प यांनी अश्रू ढाळतच आपल्यावरील अत्याचार सांगितला.

२०१६ साली जॉनी डेप्प आणि एंबर हर्ड यांच्यामध्ये घटस्फोट झाला. जॉनी यांच्यावर मारहाणीचे आरोप एंबर हर्ड हिने केले होते. परंतु, जॉनी यांनी आता नवीन कागदपत्रे न्यायालयासमोर मांडून एंबर हर्डवर आरोप केले आहेत. एंबर हर्ड अनेकदा दारूच्या नशेत मारहाण करत होती. यामुळे जॉनी जखमीही झाले होते, असे आरोप जॉनी डेप्प यांनी केले आहेत.

जॉनी डेप्प यांनी आपली पत्नी एंबर हर्ड हिच्यासोबत घटस्फोट घेतला आहे. आता या दोघांमध्ये ५० मिलियन डॉलर (३४८ कोटी) यावरून वाद सुरु आहे. जॉनी डेप्प यांनी आपली पूर्व पत्नीला मानहानीची रक्कम द्यावी, अशी मागणी केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.