मुंबई – ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेता अरमान कोहलीला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या न्यायालयाने बुधवारी ही शिक्षा सुनावली. अरमानच्या घरावर शनिवारी 29 ऑगस्ट रोजी एनसीबीकडून छापा टाकण्यात आला होता आणि यावेळी अभिनेत्याच्या घरातून ड्रग्ज सापडले होते.
अरमान व्यतिरिक्त ड्रग पेडलर अजय सिंगलाही अटक करण्यात आली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सिंग हा हिस्ट्री शीटर आहे आणि कोहलीचे नाव चौकशी दरम्यानच समोर आले. अहवालांनुसार, कोहली आणि सिंग व्यतिरिक्त, एनसीबीने ड्रग्स प्रकरणात आणखी 4 लोकांना अटक केली आहे, ज्यात 2 नायजेरियन नागरिक होते. सध्या एनसीबी बाकीच्यांचीही चौकशी करत आहे.
एनसीबीने अरमानच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्याच्याकडे “अमेरिकन कोकेन’ सापडले होते. महत्त्वाचे म्हणजे हे “अमेरिकन कोकेन’ विशेष आणि महागडे असते. यामुळे हे अरमानकडे आले कसे याबद्दल आता तपास सुरू करण्यात आला आहे. आता ड्रग्ज तस्करांची कोणती गॅंग यात सहभागी आहे, हे ड्रग्ज कसं आणले जाते हे शोधण्यावर आता एनसीबीचा भर असणार आहे.