अंमली पदार्थ विक्री करणारी टोळी गजाआड : साडेचोवीस लाखाचा गांजा जप्त

 

पुणे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीला खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने(पश्‍चिम विभाग) जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून 130 किलो गांजासह 24 लाख 53 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

अरुण बळीराम जाधव(26,रा.निगडी), प्रशांत हरीभाऊ शिंदे(निगडी), शुभम सुनिल मोहिते(19,रा.पांगरी, खेड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातील गाडीत पाच गोण्यामधून 130 किलो 250 ग्रॅम गांजा, रोख रक्कम सापडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार डॉ.के.व्यंकटेशम, सह आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शहर अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी मार्गदर्शनपर सूचना दिल्या आहेत. त्यानूसार उपायुक्त संभाजी कदम व सह आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमंली पदार्थ विरोधी पथकाचे पथक गस्त घालत होते. यावेळी पोलीस कर्मचारी प्रमोद गाडे यांना टाटा झेस्ट गाडीतून गांजा वाहतूक होत असल्याची खबर मिळाली. त्यानूसार शास्त्रीनगर चौकात सापळा रचण्यात आला. संशयीत गाडी दिसताच तीला थांबण्याचा इशारा देऊनही ती थांबली नाही. यामुळे संशय आल्याने संबंधीत गाडी येरवडा येथील डॉन बॉस्को शाळेच्या रस्त्यावर अडवण्यात आली. यावेळी गाडीतील तीघांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता गाडीत गांज्यांची पोती सापडली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक, दत्ताजी मोहिते, पोलीस कर्मचारी प्रदिप गाडे, रमेश गरुड, मंगेश पवार, सुनिल चिखले, विजय गुरव, महेश कदम, साहिल शेख, मनोज शिंदे, फिरोज बागवान, प्रमोद टिळेकर, प्रदीप शितोळे, प्रविण पडवळ, रुपाली कर्णवर, मोहन येलपले यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.