नवी दिल्ली : गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात दुर्दैवी आणि भीषण अपघात झाला आहे. प्रवाशाने भरलेल्या बसला हा अपघात झाला आहे. बस चालवत असतानाच चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बसने कारला दिलेल्या धडकेत नऊ प्रवासी ठार झाले असून, २८ जण जखमी झाले आहेत.
प्रवाशांनी भरलेली बस सूरतमधील प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव कार्यक्रमातून परतत होती. यावेळी नवसारी राष्ट्रीय महामार्गावर बसने कारला धडक दिली. चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने बसवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याचा मृत्यू झाला.
Gujarat: Nine dead as bus collides with SUV in Navsari
Read @ANI Story | https://t.co/TNiq1klEOq#Gujarat #RoadAccident #Navsari pic.twitter.com/PiStS24hRg
— ANI Digital (@ani_digital) December 31, 2022
या भीषण अपघातात कारमधील नऊ प्रवाशांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून बसमधील २८ जण जखमी झाले आहेत. ११ जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस सूरत येथून वलसाडला चालली होती. कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला होती अशी माहिती नवसारीचे पोलीस अधिक्षक ऋषीकेश उपाध्याय यांनी दिली आहे.
कारमधील सर्व प्रवासी गुजरातच्या अंकलेश्वर येथील आहेत. ते सर्वजण वलसाड येथून आपल्या घरी निघाले होते. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.